Devendra Fadnavis : मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने युतीधर्म मोडला, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे की, शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढवली आणि सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बनवले. तुमच्या सर्व लोकांनी मोदीजींचे फोटो लावून लावून मत मागितली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा लगावला. मागील 25 वर्षापासून शिवसेना गोव्यात निवडणूक लढवत आहे. पण एकदाही ते त्यांच्या उमेदवाराचे डिपॉजीट वाचूव शकले नाहीत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे. आदित्य ठाकेरेंना इतिहासच माहित नाही. पूर्ण ताकतीने शिवसेना गोव्यात भाजप विरुद्ध लढली. आमची मते घेऊन आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला असे फडणवीस म्हणाले. इतिहास विसरुन हे लोकं बोलतात. मागच्यावेळी मी यांना उत्तर प्रदेशचीही आठवन करुन दिली. राम जन्माच्या आंदोलनानंतर उत्तर प्रेदशमध्ये 200 जागा हे लढले होते. एकाही जागेवर हे डिपॉजीट वाचवू शकले नाहीत. उलट यांनी प्रत्येक वेळी आम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला असेही फडणवीस म्हणाले.

admin