logo_banner
Breaking
  • ⁕ 70 साल में किसानों को सरकार ने लुटा, किसी ने नहीं किया काम, जारंगे पाटिल ने कहा- मदद करने का यह सही समय ⁕
  • ⁕ लावणी पर थिरकी एनसीपी अजित पवार गुट! पार्टी कार्यालय के भीतर नाच-गाने पर बवाल, आलाकमान ने अध्यक्ष अहिरकर से माँगा स्पष्टीकरण ⁕
  • ⁕ किसानों की कर्ज माफी पर महाराष्ट्र सरकार का सकारात्मक रुख, मंत्री बावनकुले ने कहा - 'असली' किसानों को मिले लाभ ⁕
  • ⁕ कर्ज माफी पर नया ट्विस्ट: बच्चू कडू बोले- 'सरकारी नौकरी' और 'अमीर किसानों' को नहीं चाहिए लोन माफी ⁕
  • ⁕ Buldhana: जिले में बेमौसम बारिश ने दी दस्तक, कटाई के सीजन में फसलों को भारी नुकसान का खतरा ⁕
  • ⁕ Chandrapur: केसला घाट इलाके में बाघ ने बाइक सवार पर किया हमला, लोगों में डर का माहौल ⁕
  • ⁕ Amravati: कमुंजा फाटा के पास तेज़ रफ़्तार बस ने बाइक को मारी टक्कर, हादसे में एक की मौत, एक गंभीर ⁕
  • ⁕ विदर्भ सहित राज्य के 247 नगर परिषदों और 147 नगर पंचायतों में अध्यक्ष पद का आरक्षण घोषित, देखें किस सीट पर किस वर्ग का होगा अध्यक्ष ⁕
  • ⁕ अमरावती में युवा कांग्रेस का ‘आई लव आंबेडकर’ अभियान, भूषण गवई पर हमले के खिलाफ विरोध प्रदर्शन ⁕
  • ⁕ Gondia: कुंभारटोली निवासियों ने विभिन्न मुद्दों को लेकर नगर परिषद पर बोला हमला, ‘एक नारी सबसे भारी’ के नारों से गूंज उठा आमगांव शहर ⁕
Bhandara

MS Dhoni: खाकी रंगाचा शर्ट, खांद्यावर रुमाल आणि ओठांवर मिशा; महेंद्रसिंह धोनीचा हटके लूक


भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आजही त्याच्या चाहत्यांमध्ये कोणतीही कमतरता जाणवली नाही.

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं (MS Dhoni) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आजही त्याच्या चाहत्यांमध्ये कोणतीही कमतरता जाणवली नाही. महेंद्रसिंह धोनच्या प्रत्येक हालचालींवर त्याच्या चाहत्यांची नजर असते. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ धोनी नव्या आणि हटके लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. 

स्टार स्पोर्ट्सनं नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत कॅप्टन कूलच्या नावानं ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात दक्षिणचा सुपरस्टार रजनीकांत यांची झलक पाहायला मिळत आहे. हा आयपीएलचा प्रोमो व्हिडिओ असल्याचं म्हटलं जातंय. या व्हिडिओत महेंद्रसिंह धोनीनं बस वाहकासारखं कपडे परिधान केले आहेत. तसेच आपल्या गळ्या मोठा रुमाल टाकल्याचं दिसत आहे. या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.