logo_banner
Breaking
  • ⁕ मानसून में विदर्भ के किसानों को लगा बड़ा झटका; लगातार बारिश से एक लाख हेक्टेयर फसल हुई बर्बाद, किसानों की सरकार से स्पेशल पैकेज की मांग ⁕
  • ⁕ मानसून के दौरान चिखलदरा में टूटा पर्यटकों का रिकॉर्ड, चार महीने में पहुंचे ढाई लाख पर्यटक, नगर परिषद को हुई 56 लाख की आया ⁕
  • ⁕ मनकापुर फ्लाईओवर पर बड़ा हादसा, स्कुल वैन और बस में आमने-सामने जोरदार टक्कर; हादसे में आठ बच्चे घायल, एक की हालत गभीर ⁕
  • ⁕ Akola: चलती कार में लगी आग, कोई हताहत नहीं ⁕
  • ⁕ Akola: पातुर से अगिखेड़ खानापुर मार्ग की हालत ख़राब, नागरिकों ने किया रास्ता रोको आंदोलन ⁕
  • ⁕ एक हफ्ते बाद नागपुर में बरसे बादल, नागरिकों को मिली उमस से राहत ⁕
  • ⁕ Amravati: गणेशोत्सव मंडलों के बीच विवाद में चाकूबाजी; एक घायल, आरोपी फरार ⁕
  • ⁕ मेलघाट में बारू बांध टूटा; सड़क पर पानी बहने से यातायात बाधित ⁕
  • ⁕ अकोला में चोर ने निर्गुण नदी के पुल से चुराए लिए 105 फाटक, आरोपी की हो रही तलाश ⁕
  • ⁕ पूर्व विदर्भ में अगले 24 घंटे में होगी भारी बारिश, मौसम विभाग ने जारी किया अलर्ट; प्रशासन ने की नागरिकों से सतर्क रहने की अपील ⁕
Nagpur

रात्री झाडीपट्टीचं नाटक पाहिलं अन् पहाटे स्वत: सरण रचून आयुष्य संपवलं!


नागपूर जिल्ह्यातून  एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका वृद्धाने स्वतः सरण रचून पेटवून घेत आत्महत्या केली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही गावात आत्माराम मोतीराम ठवकर (80 वर्ष) या वृद्धाने त्यांच्या मुलाचा गॅस गोडाऊन असलेल्या शेतात एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  

महाशिवरात्रीच्या दिवशी (1 मार्चला) किन्ही गावाबाहेर असलेल्या मुलाच्या शेतात आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केल्याचे काल उघडकीस आले.  मृतक आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी असायचे.

काल रात्री त्यांनी गावात मंडई निमित्त सुरू असलेले झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद घेतला होता. पहाटे पाच वाजता शेताकडे गेले आणि शेतात असलेले लाकडं एकत्र करून सरण रचले, त्यावर तनस (गवत) टाकलं आणि त्यावर बसून सरण पेटवून घेत आत्महत्या केली. सकाळी त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळाले.

वेलतुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. दरम्यान आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी पानाचा एक विडा आणि दिवा आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. ही घटना खरंच आत्महत्या आहे की घातपात आहे,  याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.