नागपूर आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून UCN च्या रिअल इस्टेट अँड ऑटो एक्स्पोची चर्चा रंगली आहे. या तीन दिवसीय एक्स्पोचे उद्घाटन 6 डिसेंबर रोजी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. UCN चे संचालक श्री आशुतोष काणे, श्री जगदीश पालिया आणि श्री अजय खामणकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.विशेष म्हणजे, मध्य भारतात पहिल्यांदाच रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना एकाच छताखाली एकत्र आणण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहभागी देखील उपस्थित आहेत. या एक्स्पोचे उद्दिष्ट विकासाला आणि व्यवसायाच्या संधींना एक नवीन आयाम प्रदान करण्याचे आहे.6 डिसेंबरपासून सुरू झालेला तीन दिवसीय एक्स्पो 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. टाटा, रॉयल एनफिल्ड, महिंद्रा आणि BYD सारख्या प्रसिद्ध ऑटोमोबाईल ब्रँडसह तसेच पिरॅमिड, ओझन, मेट्रो आणि निर्मल ट्रिनिटी सारख्या विविध प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपन्यांनी त्यांची उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन इथे केले आहे. हा एक्स्पो ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांसाठी नवीनतम उत्पादने आणि तंत्रज्ञानाची माहिती करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ असल्याचे म्हणण्यात येते आहे एक्स्पो मध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून भरपूर बक्षीस जसे पेंच सिल्लारी येथे फॅमिली हॉलिडे, टी व्ही,फ्रिज, वॉशिंग मशीन आणि सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी व्हिसिटर्सना मिळणार आहेएक्सपोच्या पहिल्याच दिवशी स्पिन अँड विन खेळून राहुल शर्मा यांनी साऊंड बॉक्स जिंकुन आनंद व्यक्त केला,विजेत्यांना यु सी एन चे संचालक श्री अजय खामणकर,सौ सपना खामणकर आणि श्री आर्यन खामणकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.